23.1 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त बुलडाण्यात जनजागृती रॅली; नागरिकांना सहभागाचे आवाहन…. ‘नेत्रदान हेच जीवनदान’ संदेश देत १० जून रोजी भव्य रॅली; राधेश्याम चांडक यांचे आवाहन…

बुलढाणा ब्रेकिंग

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त बुलडाण्यात जनजागृती रॅली; नागरिकांना सहभागाचे आवाहन….

‘नेत्रदान हेच जीवनदान’ संदेश देत १० जून रोजी भव्य रॅली; राधेश्याम चांडक यांचे आवाहन…

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड (राष्ट्रीय अंध कल्याण संघ) जिल्हा शाखा बुलडाणा, बुलडाणा ऑप्थल्मिक सर्जन सोसायटी आणि विदर्भ ऑप्थल्मिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, १० जून २०२६ रोजी ‘नेत्रदान हेच जीवनदान’ या जनजागृती मोहिमेअंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, संगम चौक येथून रॅलीला सुरुवात होणार असून तिची सांगता नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईडच्या गांधी भवन, जयस्तंभ चौक येथील कार्यालयात होणार आहे.
या रॅलीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. वसंतराव चिंचोले, विदर्भ ऑप्थल्मिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त मनोज मेरत, जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी प्रमोद येंडोले यांच्यासह विविध मान्यवर सहभागी होणार आहेत.
कॉर्नियल अंधत्वामुळे अनेक रुग्णांना अंधारमय जीवन जगावे लागते. नेत्रदानाच्या माध्यमातून अशा रुग्णांना नवजीवन मिळू शकते, या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. रॅलीमध्ये नेत्रतज्ज्ञ, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईडचे सदस्य, कर्मचारी तसेच वसंतप्रभा नर्सिंग कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
ज्या नागरिकांनी नेत्रदानासाठी संमती दिली आहे किंवा या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे, अशा सर्वांचे स्वागत करण्यात येणार असून बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड बुलडाणाचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या