31.3 C
New York
Thursday, June 18, 2026

Buy now

spot_img

काशी विश्वनाथ दर्शनासाठी गेलेले ८७ वर्षीय कोतिकराव जाधव बेपत्ता; कुटुंबीयांची शोधासाठी आर्त हाक*

बुलढाणा

*काशी विश्वनाथ दर्शनासाठी गेलेले ८७ वर्षीय कोतिकराव जाधव बेपत्ता; कुटुंबीयांची शोधासाठी आर्त हाक*

*माहिती देणाऱ्यास ₹५१ हजारांचे बक्षीस जाहीर; नागरिकांनी शोध मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन*

नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील रहिवासी कोतिकराव तोताराम जाधव (वय ८७ वर्षे) हे काशी विश्वनाथ दर्शनासाठी गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ते २९ मे २०२६ रोजी घरातून काशी विश्वनाथ यात्रेसाठी निघाले होते. मात्र त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसून ते अद्याप घरी परतलेले नाहीत. बेपत्ता झालेल्या कोतिकराव जाधव यांची उंची सुमारे ५ फूट १० इंच, रंग सावळा आणि बांधा सडपातळ आहे. त्यांच्या डोक्यावर पांढरी गांधी टोपी, अंगात पांढरा कुर्ता, पांढरे धोतर तसेच खांद्यावर उपरणे असून गळ्यात माळ असल्याचे सांगण्यात आले आहे. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले असून, कोतिकराव जाधव यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ९०११५२५१९० या क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, बेपत्ता वृद्धाचा शोध लावणाऱ्या अथवा खात्रीशीर माहिती देणाऱ्या व्यक्तीस ₹५१ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करून शोधकार्याला सहकार्य करावे, असे आवाहन कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या