खारघरमध्ये ‘अभिता ई सुविधा केंद्रा’चे उद्घाटन; नागरिकांना आता सर्व डिजिटल सेवा एकाच छताखाली…
नवी मुंबईत आधुनिक सेवांचा नवा पर्याय; अभिता ई सुविधा केंद्र सुरू….
नवी मुंबई :
खारघर येथे ‘अभिता ई सुविधा केंद्रा’च्या पहिल्या शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. नागरिकांना विविध डिजिटल, बँकिंग आणि शासकीय सेवा जलद, विश्वासार्ह व पारदर्शक पद्धतीने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.
सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांना अनेक शासकीय आणि आर्थिक सेवांसाठी विविध ठिकाणी जावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी अभिता ई सुविधा केंद्राच्या माध्यमातून आधार सेवा, यूपीआय सेवा, मनी ट्रान्सफर, टॅक्स फायलिंगसह अनेक महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेळेची बचत होऊन अधिक सोयीस्कर सेवा मिळणार आहे.
उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी केंद्राच्या उपक्रमाचे कौतुक करत नागरिकांसाठी हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. “आपला विश्वास आणि सहकार्य हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. याच विश्वासाच्या बळावर अधिक गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत,” अशी भावना केंद्राच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.
खारघर परिसरातील नागरिकांसाठी हे केंद्र डिजिटल सेवांचे विश्वासार्ह केंद्र ठरणार असून आगामी काळात आणखी सेवा विस्तार करण्याचा मानस व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
अधिक माहितीसाठी :
www.abhitaesuvidhakendra.com



