27.2 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांना 20 कोटींची ऑफर?; संजय राऊतांच्या दाव्याने राज्यात खळबळ* *“मी कायम काँग्रेससोबतच”; आमदार धीरज लिंगाडे यांनी ऑफरचे दावे फेटाळले*

*बुलढाणा ब्रेकिंग*

*काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांना 20 कोटींची ऑफर?; संजय राऊतांच्या दाव्याने राज्यात खळबळ*

*“मी कायम काँग्रेससोबतच”; आमदार धीरज लिंगाडे यांनी ऑफरचे दावे फेटाळले*

राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून काँग्रेसचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जाण्यासाठी तब्बल 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून विविध स्तरांवर चर्चा रंगू लागल्या आहेत.
महाविकास आघाडीचे प्रमुख नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना काही आमदारांना सत्ताधारी गटाकडून आर्थिक आमिष दाखवले जात असल्याचा आरोप केला होता. त्यामध्ये काँग्रेसचे पदवीधर आमदार धीरज लिंगाडे यांचे नाव घेत 20 कोटींच्या ऑफरचा दावा करण्यात आला होता. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
दरम्यान, आमदार धीरज लिंगाडे यांनी मात्र या सर्व दाव्यांचे स्पष्ट शब्दांत खंडन केले आहे. “मला कुठल्याही प्रकारची ऑफर आलेली नाही. संजय राऊत यांनी केलेला दावा चुकीचा आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच आपण काँग्रेस पक्षासोबत कायम ठामपणे उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
“मी काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता असून पक्ष सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्याबाबत सुरू असलेल्या चर्चा आणि अफवा निराधार आहेत,” असेही लिंगाडे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर राजकीय चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या