27.2 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

जिल्हा सामान्य रुग्णालयात मोकाट कुत्र्यांचा हैदोस; रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू!…. वार्डात कर्मचारी नाहीत, पलंगाजवळ कुत्रे-डुकरे; बुलढाणा जिल्हा रुग्णालयाची भयावह अवस्था उघड!

बुलढाणा ब्रेकिंग

जिल्हा सामान्य रुग्णालयात मोकाट कुत्र्यांचा हैदोस; रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू!….

वार्डात कर्मचारी नाहीत, पलंगाजवळ कुत्रे-डुकरे; बुलढाणा जिल्हा रुग्णालयाची भयावह अवस्था उघड!

बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक आणि संतापजनक वास्तव समोर आले आहे. रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या वार्डांमध्ये मोकाट कुत्रे आणि डुकरे बिनधास्तपणे फिरताना दिसत असून रुग्णांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी कुत्रे थेट रुग्णांच्या खाटेजवळ फिरताना दिसत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी जिल्हा सामान्य रुग्णालय अक्षरशः बेवारस असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वार्डांमध्ये कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याने मोकाट जनावरे थेट तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचत असल्याचा आरोप होत आहे. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे हे विदारक चित्र समोर आले असून प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्याच्या मुख्यालयातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयातच अशी गंभीर परिस्थिती असेल, तर ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयांची अवस्था किती बिकट असेल, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतिनिधित्व करत असलेल्या जिल्ह्यात रुग्णालयांची अशी अवस्था असणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब मानली जात आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन रुग्णांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांकडून होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या