27.2 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानचोरीच्या निषेधार्थ वरवट बकाल येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)ची महाआरती..*

बुलढाणा ब्रेकिंग

*अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानचोरीच्या निषेधार्थ वरवट बकाल येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)ची महाआरती..*

*लोकवर्गणीत उभारलेल्या श्रीराम मंदिरातील पारदर्शक कारभाराचा केला गौरव; पदाधिकारी व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती*

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात झालेल्या कथित दानचोरीच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संग्रामपूर तालुक्याच्या वतीने वरवट बकाल येथील श्रीराम मंदिरात सोमवारी महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंदिरातील पारदर्शक व्यवस्थापनाचा आदर्श समोर ठेवत, भाविकांनी दिलेल्या दानाचा योग्य उपयोग होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
विशेष म्हणजे, ज्या दिवशी अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले होते, त्याच दिवशी लोकवर्गणीतून वरवट बकाल येथील श्रीराम मंदिराच्या उभारणीला प्रारंभ करण्यात आला होता. गावकऱ्यांच्या सहकार्याने उभारलेल्या या मंदिराचा कारभार आजही पूर्णपणे पारदर्शकपणे सुरू असून, भाविकांनी दिलेल्या दानाचा उपयोग धार्मिक व सामाजिक कार्यासाठी केला जात असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
महाआरतीनंतर अयोध्येतील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. मंदिरांतील दान आणि धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता व उत्तरदायित्व राखणे आवश्यक असल्याचे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
यावेळी पक्ष प्रवक्त्या ॲड. जयश्रीताई शेळके, सहसंपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळभांडे, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, विधानसभा संघटक भीमराव पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र झाडोकार, उपतालुकाप्रमुख विजय मारोडे, तालुका संघटक राहुल मेटांगे, युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज मिसाळ, विधानसभा संघटक अजय घिवे, युवासेना तालुकाप्रमुख प्रशांत इंगळे, उपतालुकाप्रमुख डॉ. श्रीराम दाभाडे, पळशी झाशीच्या सरपंच प्रियंकाताई मेटांगे, पुष्पाताई वाघ, शाखाप्रमुख प्रल्हादभाऊ आस्वार, निलेशभाऊ झाडोकार, सरपंच रामेश्वरभाऊ खंडेराव, अमोलभाऊ बकाल, मनोजभाऊ बकाल, मनोजभाऊ वाघ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या