23.1 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

बुलढाणा शहर पोलिसांची मोठी कामगिरी; साडेसात लाखांचे ५० हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांच्या ताब्यात!*..

बुलढाणा ब्रेकिंग

*बुलढाणा शहर पोलिसांची मोठी कामगिरी; साडेसात लाखांचे ५० हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांच्या ताब्यात!*

*’CEIR’ पोर्टलच्या मदतीने दोन महिन्यांत यश; मुंबई, पुणे, संभाजीनगर, अमरावती आणि जळगाव येथून मोबाईल जप्त*

बुलढाणा शहर पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत नागरिकांना मोठा दिलासा देणारी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गेल्या दोन महिन्यांत हरवलेले तब्बल ५० मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात पोलिसांना यश आले आहे. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे साडेसात लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत अनेक नागरिकांचे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.
या पथकाने केंद्र सरकारच्या ‘CEIR’ (Central Equipment Identity Register) पोर्टलचा तसेच आधुनिक तांत्रिक तपास पद्धतींचा वापर करून हरवलेल्या मोबाईलचा माग काढला. तपासादरम्यान मुंबई, पुणे, संभाजीनगर, अमरावती आणि जळगाव या विविध शहरांतून हे मोबाईल शोधून जप्त करण्यात आले.
तपासात असेही समोर आले की, स्वस्त दरात मिळत असल्याने अनेक तरुणांनी अनोळखी व्यक्तींकडून हे मोबाईल खरेदी केले होते. मात्र, तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संबंधित मोबाईल हस्तगत करून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले.
हरवलेले महागडे मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांनी बुलढाणा शहर पोलिसांच्या तत्परता, तांत्रिक कौशल्य आणि कार्यक्षमतेचे कौतुक करत आभार व्यक्त केले आहेत.
नागरिकांसाठी आवाहन :
मोबाईल हरवल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा आणि CEIR पोर्टलवर मोबाईल ब्लॉक करण्यासाठी अर्ज करा. तसेच कोणताही मोबाईल खरेदी करताना त्याची कागदपत्रे आणि मालकीची खात्री करूनच व्यवहार करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या