27.5 C
New York
Friday, August 7, 2026

Buy now

spot_img

पंढरपूरसाठी बुलढाण्याहून सायकल आनंद वारी रवाना; 10 तरुणींसह 100 हून अधिक सायकलस्वारांचा उत्साही सहभाग*

बुलढाणा ब्रेकिंग

*पंढरपूरसाठी बुलढाण्याहून सायकल आनंद वारी रवाना; 10 तरुणींसह 100 हून अधिक सायकलस्वारांचा उत्साही सहभाग*

*साडेचारशे किलोमीटरचा प्रवास चार दिवसांत पूर्ण; आरोग्य, पर्यावरण आणि अध्यात्माचा सुंदर संगम*

“देखना है कल तो चलाओ सायकल” हे ब्रीदवाक्य घेऊन बुलढाणा जिल्हा सायकलिंग क्लबच्या वतीने आयोजित करण्यात येणारी बुलढाणा ते पंढरपूर सायकल आनंद वारी यंदाही मोठ्या उत्साहात रवाना झाली. गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत असून, यंदा 10 तरुणींसह 100 हून अधिक सायकलस्वार या आनंदवारीत सहभागी झाले आहेत.
आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार, पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि विठ्ठलभक्तीचा अध्यात्मिक अनुभव या तिन्ही उद्दिष्टांचा सुंदर संगम या सायकल वारीत पाहायला मिळतो. बुलढाण्यातून पंढरपूरपर्यंतचा सुमारे साडेचारशे किलोमीटरचा प्रवास हे सायकलस्वार चार दिवसांत पूर्ण करणार आहेत. ही आनंदवारी 11 जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार असून, 12 जुलै रोजी राज्यभरातून आलेल्या हजारो सायकलस्वारांच्या भव्य रिंगण सोहळ्यात बुलढाण्याचे सायकलस्वार सहभागी होणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात पाच वर्षांपूर्वी केवळ तीन सायकलस्वारांपासून झाली होती. मात्र, सातत्य, शिस्त आणि समाजहिताचा संदेश यामुळे या उपक्रमाची लोकप्रियता वर्षागणिक वाढत गेली. आज या आनंदवारीत शंभरपेक्षा अधिक सायकलस्वार सहभागी होत असून, महिलांचाही लक्षणीय सहभाग ही या उपक्रमाची विशेष बाब ठरत आहे. या सायकल आनंद वारीला बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक आणि शिवसेनेच्या अनुजा सावळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सायकलस्वारांना शुभेच्छा देत सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. सायकल वारीमुळे शारीरिक तंदुरुस्ती, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि वारकरी परंपरेची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचत असल्याची भावना सहभागी सायकलस्वारांनी व्यक्त केली. बुलढाण्यातून विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या या आनंदवारीकडे नागरिकांचेही विशेष लक्ष लागले असून, मार्गभर विविध ठिकाणी या सायकलस्वारांचे स्वागत करण्यात येणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या