23.1 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

येळगाव धरणाच्या पाणीपातळीत वाढ; जलसाठा 35 टक्क्यांवर, तरी बुलढाण्यात आठ दिवसांनीच पाणीपुरवठा..*

बुलढाणा ब्रेकिंग

*येळगाव धरणाच्या पाणीपातळीत वाढ; जलसाठा 35 टक्क्यांवर, तरी बुलढाण्यात आठ दिवसांनीच पाणीपुरवठा..*

*धरणात पाण्याची आवक वाढली; मात्र बुधनेश्वर, दहीद, पळसखेड, पाडळी आणि देऊळघाट परिसर अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत*

बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून धरणात सध्या 35 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. अलीकडील पावसामुळे धरणात काही प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने दिलासा मिळाला आहे.
मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बुधनेश्वर, दहीद, पळसखेड, पाडळी आणि देऊळघाट या भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने अधिक जलसाठ्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
दरम्यान, धरणातील जलसाठ्यात वाढ होऊनही शहरात अद्याप आठ दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा कधी सुरू होणार, याकडे बुलढाणेकरांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने आगामी पावसावर परिस्थिती अवलंबून असल्याचे संकेत दिले आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या