33.8 C
New York
Friday, August 7, 2026

Buy now

spot_img

जिल्हास्तरीय सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न; शारदा ज्ञानपीठचे दुहेरी विजेतेपद..*

बुलढाणा

*जिल्हास्तरीय सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न; शारदा ज्ञानपीठचे दुहेरी विजेतेपद..*

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६५ वी जिल्हास्तरीय सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धा १७ ते १९ जुलै २०२६ या कालावधीत सहकार विद्या मंदिर, चिखली रोड, बुलढाणा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांच्या १५ संघांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा कोमलजी झंवर, तालुका क्रीडा अधिकारी प्रशांत मडले, सहकार विद्या मंदिराचे प्राचार्य सामी, जिल्हा फुटबॉल संघटनेचे सदस्य मुकेश बाफना, क्रीडा शिक्षक, पंच, खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांसह उपस्थित क्रीडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या