नवी मुंबई :
खारघर येथील अभिता लँड सोल्युशनच्या मुख्य कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मिशन पँथर 1970’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरचे दिमाखदार लॉन्चिंग करण्यात आले. दिग्दर्शक सुनील शेळके यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘मिशन पँथर 1970’चा फर्स्ट लूक पोस्टर लॉन्च; खारघरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळा
“जे लढतात सत्यासाठी, जे मरतात सत्यासाठी…” — ‘मिशन पँथर 1970’ची उत्सुकता वाढली
खारघर येथील अभिता लँड सोल्युशनच्या मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ‘मिशन पँथर 1970’ या मराठी चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी चित्रपटसृष्टीतील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
दिग्दर्शक सुनील शेळके यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पोस्टरवरून चित्रपटाची कथा सत्यासाठी संघर्ष, धैर्य आणि इतिहास घडविणाऱ्या लढवय्यांच्या विचारांभोवती फिरत असल्याचे संकेत मिळत आहेत.
“जे लढतात सत्यासाठी… जे मरतात सत्यासाठी… ते इतिहासाचे ताईत बनतात… त्यांनाच म्हणतात… पँथर…!” या प्रभावी ओळींमुळे चित्रपटाच्या आशयाची झलक पाहायला मिळत आहे.
चित्रपटात चिन्मय मांडलेकर आणि कैलास लीलावाघमारे यांच्यासह इतर कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘मिशन पँथर 1970’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आता वाढली आहे.



