*बुलढाणा*
*”बुलढाणा अर्बन” च वैद्यकीय मदत पथक नेपाळसाठी रवाना.*
*नेपाळमधील पूर पीडितांची करणार वैद्यकीय सेवा.*
*बुलढाणा अर्बन चारीटेबल सोसायटीकडून पाठवण्यात आलं देशातील पहिल स्वतंत्र पथक.*
देशात कुठेही नैसर्गिक आपत्ती असेल तर “बुलढाणा अर्बन परिवार” तात्काळ आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदती आणि सेवेसाठी धावून जात असतो. याच पार्श्वभूमीवर अलीकडेच नेपाळमध्ये आलेल्या महाभयंकर पुरामुळे हजारो नागरिकांचा मृत्यू झाला तर लाखो नागरिक या आपत्तीमुळे बेघर झाले आहेत. महापुरानंतर त्या परिसरात अनेक आरोग्य समस्या स्थानिकांना उद्भवल्या आहेत, महापुरामुळे रस्ते व पूल वाहून गेल्याने दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे अतिशय दुर्गम भागात डॉक्टरांची कमतरता भासत असल्याने बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक व डॉ. सुकेश झंवर यांनी नेपाळमध्येही तेथील अपदाग्रस्त नागरिकांच्या वैद्यकीय सेवेसाठी पाच डॉक्टरांच पथक औषधांसह नेपाळला रवाना केला आहे. हे पथक नेपाळमधील कोसी, बागमती आणी गंडकी या प्रांतात महापुरामुळे उध्वस्त झालेल्या नागरिकांची सेवा करणार आहे. अत्यावश्यक औषधांसह पाच डॉक्टरांच हे पथक नेपाळला रवाना झाल आहे. पुढील आठवडाभर हे पथक विविध दुर्गम भागात जाऊन स्थानिक नेपाळी नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवणार आहे. अशा प्रकारचं नेपाळला जाणार देशातील हे पहिलं स्वतंत्र पथक आहे. या पथकाला नेपाळ सरकारमधील गृह विभागाचे अधिकारी आनंदा काफले, नेपाळ सरकारच्या आरोग्य सचिव सुस्मिता छेत्री, नेपाळ सरकारमधील वित्त विभागाचे सचिव नबीन दूंगा व इंदिरा पंत हे नेपाळमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. संजय महाजन यांच्या नेतृत्वात हे पथक नेपाळ मधील आपदा पीडित नागरिकांची सेवा करणार आहेत.



