14.5 C
New York
Monday, October 19, 2026

Buy now

spot_img

बुलढाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण..* *तीन आठवडे स्वाइन फ्लू चा रुग्ण विविध डॉक्टरांकडे उपचार घेत फिरल्याने आजार पसरण्याचा वाढला धोका.* *खाजगी डॉक्टरांकडून इपिडेमिक ऍक्ट 1897 च उल्लंघन..?*

*बुलढाणा ब्रेकिंग*

*बुलढाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण..*

*तीन आठवडे स्वाइन फ्लू चा रुग्ण विविध डॉक्टरांकडे उपचार घेत फिरल्याने आजार पसरण्याचा वाढला धोका.*

*खाजगी डॉक्टरांकडून इपिडेमिक ऍक्ट 1897 च उल्लंघन..?*

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील एका गावात H1N1 अर्थात स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा रुग्ण तीन आठवड्यांपासून आजारी असल्याने व नांदुरा शहरातील विविध तीन डॉक्टरांकडे या रुग्णाने उपचार घेतल्याने या रुग्णामुळे आजार पसरण्याचा धोका वाढला आहे. स्वाइन फ्लू चा रुग्ण असूनही खाजगी डॉक्टरांनी शासकीय यंत्रणेला कळवलं नसल्याने यात इपिडिमिक ऍक्ट 1897 च उल्लंघन खाजगी डॉक्टरांकडून झालं आहे. यावर आता आरोग्य विभाग काय कारवाई करतो हे बघणं महत्त्वाचं असेल. 45 वर्षीय हा रुग्ण नांदुरा येथील तीन खाजगी रुग्णालयात एकेक आठवडा उपचार घेऊन खामगाव येथील एका खाजगी रुग्णालयात आला खामगाव येथील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी स्वाइन फ्लूची तपासणी केल्यानंतर हा रुग्ण स्वाईन फ्लूचा असल्याचे निष्पन्न झालं. व त्यानंतर आरोग्य विभागाची एकच धावपळ उडाली. खाजगी रुग्णालयात हा रुग्ण फिरत असल्याने इतरही रुग्णांना लागण झाली आहे का याची तपासणी व चाचपणी आता आरोग्य विभाग करत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या