10.3 C
New York
Sunday, October 18, 2026

Buy now

spot_img

काळेगाव-जयपूरमध्ये नवीन पाझर तलावांच्या निर्मितीसाठी आमदार संजय गायकवाड मैदानात; अधिकाऱ्यांसह थेट शिवारात जाऊन पाहणी….* *शेतकऱ्यांना बारमाही सिंचनासाठी जलसंधारणावर भर; तातडीने सर्वेक्षण करून तांत्रिक अहवाल सादर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश…*

बुलढाणा ब्रेकिंग*

*काळेगाव-जयपूरमध्ये नवीन पाझर तलावांच्या निर्मितीसाठी आमदार संजय गायकवाड मैदानात; अधिकाऱ्यांसह थेट शिवारात जाऊन पाहणी….*

*शेतकऱ्यांना बारमाही सिंचनासाठी जलसंधारणावर भर; तातडीने सर्वेक्षण करून तांत्रिक अहवाल सादर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश…*

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात शेतकऱ्यांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये आणि शेतीसाठी बारमाही सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आमदार संजय गायकवाड यांनी काळेगाव आणि जयपूर येथे नवीन पाझर तलावांच्या निर्मितीसाठी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात आमदार गायकवाड यांनी प्रस्तावित पाझर तलावांच्या जागांची पाहणी करत जलसाठ्यांची क्षमता, परिसरातील शेतीला होणारा फायदा आणि भविष्यातील सिंचनाच्या गरजांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रस्तावित तलावांचे तातडीने सर्वेक्षण करून सविस्तर तांत्रिक अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या दौऱ्यात नळगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्प तसेच मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नवीन पाझर तलावांच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडवणे, भूजल पातळीत वाढ करणे आणि परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. दरम्यान, दिवसभराच्या पाहणी दौऱ्यात आमदार संजय गायकवाड यांनी वाहनातच जेवण केले. शेतकऱ्यांच्या शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळावे आणि त्यांना वारंवार दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागू नये, यासाठी जलसंधारणाच्या ठोस उपाययोजना राबविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
आता काळेगाव आणि जयपूर येथील प्रस्तावित पाझर तलावांच्या सर्वेक्षणाचा अहवाल कधी सादर होतो आणि प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या