10.2 C
New York
Monday, October 19, 2026

Buy now

spot_img

दुष्काळाच्या काळात वाढदिवसाचा खर्च टाळला; शारदाताई पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर* *केक-कटिंगऐवजी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या; दुष्काळाच्या संकटात शारदाताईंचा मदतीचा हात*

*बुलढाणा फ्लॅश*

*दुष्काळाच्या काळात वाढदिवसाचा खर्च टाळला; शारदाताई पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर*

*केक-कटिंगऐवजी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या; दुष्काळाच्या संकटात शारदाताईंचा मदतीचा हात*

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत स्वतःचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा न करण्याचा निर्णय शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. शारदाताई पाटील यांनी घेतला आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याला त्यांनी प्राधान्य दिले. दुष्काळामुळे पिकांची झालेली अवस्था, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्या समस्या यांची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीची माहिती त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मदतीची गरज असून, त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार असल्याचे शारदाताई पाटील यांनी सांगितले.

वाढदिवस हा केवळ स्वतःच्या आनंदाचा दिवस न ठेवता, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसोबत उभे राहण्याचा संकल्प करण्याचा दिवस ठरवला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटातून जात असताना दुष्काळाच्या या संकटावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने पुढे येण्याची गरज आहे.

शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, त्यांच्या मदतीसाठी आपण सर्वजण तयार आहोत, असा धीरही सौ. शारदाताई पाटील यांनी दिला.

वाढदिवसाचा जल्लोष बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेल्या शारदाताई पाटील यांच्या या भूमिकेची सध्या बुलढाणा जिल्ह्यात चर्चा होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या