*बुलढाणा धक्कादायक ब्रेक*
*सिगारेट आणि चहा दिला नाही म्हणून डॉक्टर ने महिलेला निर्वस्त्र केलं*
*महिलेला विवस्त्र करून डॉक्टरांची मारहाण , महिला जखमी.*
रात्री तीन वाजता जळगाव जामोद येथील एका महिलेच्या घरी जाऊन महिलेला चहा व सिगारेट मागितली ….मात्र महिलेने यावेळी देण्यास नकार दिला व सकाळी या असं सांगितलं त्यामुळे चिडून जाऊन जळगाव जामोद येथील नराधम डॉ गोविंद वानखेडे याने या महिलेला विवस्त्र करून तिला मारहाण करण्याची धक्कादायक घटना जळगाव जामोद येथे घडली आहे. या घटनेत महिला जखमी झाली असून तिच्यावर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. या महिलेच्या अंगावरील संपूर्ण वस्त्र फाडून या महिलेला विवस्त्र करण्याची धक्कादायक घटना जळगाव जामोद शहरात घडली आहे. पोलिसांनी पोलिसांनी या नराधम डॉ. गोविंद वानखेडे वर कलम 376/2024 , 74,75,76,,296,324(1),333,352,351(2),351(3),3(5) भारतीय न्याय संहितेनुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून आरोपी डॉ.गोविंद वानखेडे फरार झाला आहे.