*बुलढाणा विधानसभे साठी प्रा सदानंद माळी तगडा उमेदवार… !*
तीन लाख मतदान संख्या असलेल्या बुलढाणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीला शह देण्यासाठी अनेक उमेदवार बाशिंग बांधून तयार झाले आहेत.. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उबाठाचा उमेदवार पराभूत झाला होता.. आणी आता विधानसभेच्या निवडणुका काही काळातच होऊ घातल्या आहेत.. त्यासाठी महाविकास आघाडीकडून अनेक उमेदवार तयार झाले आहेत.. मतदारराजा सुद्धा संभ्रमात पडणार असल्याने काही मतदारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.. महायुतीच्या उमेदवारला शह देण्यासाठी महाविकास आघाडीने एकाच उमेदवारला या निवडणुकीत उतरविले पाहिजे.. त्यासाठी उच्चंशिक्षित अनुभवी जनतेच्या सुखदुःखात उभा राहणारा म्हणून दोन ते तीन भावी उमेदवारचे नावे पुढे आले आहेत त्यात प्रामुख्याने वरच्या स्थानी प्रा सदानंद माळी हे आहेत.. मात्र उमेदवारी कोणाला द्यायची ते महाविकास आघाडी ठरविणार आहे.. तसेच मधल्या काळात खा अरविंद सावंत बुलढाण्यात येऊन गेले त्यावेळी उबाठा चे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना बुलढाणा विधानसभेसाठी इच्छूक असल्याचे भावना व्यक्त केली होती.. त्यामुळे तेही चर्चेत आहेतच.. पण जनतेचा कौल कोणाकडे राहील हे येणारा काळ च ठरवेल..