बुलढाणा
- *विधानसभेच्या पार्षभूमीवर मनसे सक्रिय….राज्यपातळीवरून जिल्ह्यात चाचपणी..*
राज्यातील सर्व पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले आहे …. वरिष्ठ पातळीवरून प्रत्येक जिल्ह्यात चाचपणी केल्या जात आहे त्याचं धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने, मुंबई येथील मनसे ची टीम नुकतीच बुलढाणा जिल्ह्यात येऊन गेल्याची माहिती आहे.. त्या टीम ने बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य नागरिक , युवक, महिला यांच्याशी चर्चा केली व मनसेचे कार्या बद्दल माहिती जाऊन घेतली.. बुलढाणा जिल्ह्यातिल् सात विधानसभे पैकी किती जागेवर उमेदवार देता येईल व जिल्ह्यात कास्य परिस्थिती राहील तसा सविस्तर अहवाल वरिष्ट पातळीवर पाठविण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे..
सात विधानसभे पैकी बुलढाणा विधानसभा मनसे लढविण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.. त्यासाठी मनसेचे अमोल रिंढे पाटील सक्रिय झाले असून सामाजिक कार्यात ते अग्रेसर आहेत त्यामुळे बुलढाणा विधानसभेत त्यांचा बोलबाला दिसून येत आहे.. त्यांच्या कार्याची दखल वरिष्ट पातळीवर घेतल्या जाण्याची शक्यता दिसून येत आहे….