14.5 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

मंत्राल्यात आ संजय गायकवाड यांनी दिला आमरण  उपोषण करण्याचा इशारा…  अधिकार्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देऊन सरकारला घरचाच अहेर दिलाय…

बुलडाणा

मंत्राल्यात आ संजय गायकवाड यांनी दिला आमरण  उपोषण करण्याचा इशारा… 

अधिकार्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देऊन सरकारला घरचाच अहेर दिलाय…

बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे मुंबई मंत्रालंय येथे आमरण उपोषण करणार असल्याचे सुतोवाच केलंय. ..  आ गायकवाड सतत विविध कारणावरून चर्चेत असतात मात्र यावेळेस वेगळेच कारण समोर आलंय.. सत्तेतील शिवसेना आ संजय गायकवाड यांनी उपोषणाचा ईशारा देऊन घरचाच अहेर दिल्याची चर्चा सर्वत्र आहे…

मुख्यमंत्र्यांनी एक वर्षा आधी आमदारांच्या कामासंदर्भात बैठक घेतली. आदेश काढण्याच्या सूचना केल्या, मात्र १ वर्ष होऊनही आदेश निघाले नाहीत. त्यामुळे कामे खोळंबली आहेत. मुख्यमंत्र्यांनी २४ ऑगस्टला पुन्हा बैठक घेऊन कामासंदर्भात आदेश काढा म्हटले. तरीही आदेश निघाले नाहीत.

मुख्यमंत्री राज्यभर फिरतात, धडपड करतात. अधिकाऱ्यांनी मात्र केवळ खुर्च्छा उबवण्याचे काम करायचे का? असा सवाल करीत एका वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत आंदोलनाचा ईशारा दिलाय.. अधिकाऱ्यांच्या विरोधात मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर उपोषणाला बसणार असल्याचे आ. गायकवाड म्हणाले. जोपर्यंत कामाचे आदेश निघणार नाहीत तोपर्यंत खाली उतरणार नाही असे “त्या” वृत्तवाहिनीशी बोलताना आ. गायकवाड म्हणाले. यामुळे आ गायकवाड नेहमी आक्रमक भूमिका घेताना दिसतात आता त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून सध्या चर्चेला उधान आले आहे..

Related Articles

ताज्या बातम्या