6.5 C
New York
Thursday, December 18, 2025

Buy now

spot_img

बुलढाणा शहरातील 26 स्मारकांचे लोकार्पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते… 19 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार बुलढाण्यात…!

बुलढाणा

बुलढाणा शहरातील 26 स्मारकांचे लोकार्पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते…

19 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार बुलढाण्यात…!

अँकर
बुलढाणा शहरात 26 महापुरुषांचे स्मारक तयार झाले असून सर्व महापुरुषांचे पुतळे स्थापीत करण्यात आले आहे… या पुतळ्याचे लोकार्पण येत्या 19 सप्टेंबर ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच सांस्कृतिक मंत्री सुधीर मूनगुनटीवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आ संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली…
यासोबतच शहराचा विकास व मतदार संघातील न भूतो ना भविष्यात होणार विकास मागील दोन वर्षात करून दाखवीला त्याचा पाढाच वाचला… जे बुलढाण्याच्या इतिहासात कधीच होऊ शकले नाही त्यावर सविस्तर प्रकाश आ गायकवाड यांनी टाकला… यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाषश राऊत व नगरपालिकेचे सिओ गणेश पांडे उपस्थित होते…

बुलढाणा शहराचा चेहरा मोहरा बदलल्या गेला असून विकास झापात्याने केल्या जात आहे.. त्यात पाणी व्यवस्था, शहराला वळण रस्ता, राजूर घाटातील वाहतुकीची होणारी कोंडी यावर एकेरी वाहतूक व्यवस्था.. शहरात 210 बुद्धविहार , शादीखाना, वारकरी भवन आदी विकासाचे कामे तसेच सर्व महापुरुषांचे पुतळे , प्रत्येक चौकात सुशोभीकरण अशी कामे आ संजय गायकवाड यांनी केली आहे.. राज्यातील.सर्वात जास्त विकास निधी खेचून आणण्याचे काम एकमेव आ गायकवाड यांनी केले आहे..
सर्व शासकीय इमारती जीर्ण झाल्या होत्या त्या नवीन निर्माणधीन केल्या आहेत..
अश्या सर्व कामाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे..

Related Articles

ताज्या बातम्या