केंद्र शासनाच्या स्वयमप्रभा ऑनलाइन एज्युकेशन कौन्सिल योजनेअंतर्गत माजी आमदार विजयराव शिंदे यांच्या हस्ते शेकडो विद्यार्थ्यांना एज्युकेशन टीव्ही चे वाटप
‘स्वयमप्रभा’ योजनाही नरेंद्र मोदींची एकविसाव्या शतकातील शैक्षणिक क्रांतीचे पाऊल: माजी आमदार विजयराज शिंदे
बुलढाणा (प्रतिनिधी) देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता स्वयमप्रभा ऑनलाइन एज्युकेशन कौन्सिल ही योजना राबविण्यात येत आहे. केंद्राची ही योजना बुलढाण्याचे माजी आमदार विजयराजे शिंदे यांच्यामार्फत बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता राबविल्या जात आहे. आज शेकडो विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते शैक्षणिक टीव्ही चे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर चंद्रकांत बर्दे , अनंता शिंदे, सचिन शेळके, महादेव शिदे, गणेश दत्तात्रय शिंदे, मुन्ना बगाडे, लक्ष्मीकांत बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना माजी आमदार विजयराव शिंदे म्हणाले की, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्याकरिता स्वयमप्रभा ऑनलाईन एज्युकेशन कौन्सिलिंग हा कार्यक्रम सुरू केला आहे हा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यात सर्वप्रथम विद्यार्थ्यांकरिता आपण आणला आहे आणि या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना 65 हजाराचा टीव्ही हा फक्त नऊशे रुपयात उपलब्ध करून दिल्या जात आहे या टीव्ही मध्ये मनोरंजनासह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमाचे धडे दिल्या जाणार आहे सोबतच याचा कॅम्प्युटर म्हणून सुद्धा उपयोग केला जाऊ शकतो ऑनलाइन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा भरपूर लाभ या टीव्हीच्या माध्यमातून घेता येणार आहे. शासनाची ही योजना आपण घरोघरी पोहोचविनार आहोत. त्याकरिता आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे जवळपास 100 विद्यार्थ्यांना आज या टीव्ही संचाचे वाटप करण्यात आले आहे. लवकरच हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्याकरिता माझ्या शिवालय कार्यालयात विनामूल्य अर्ज विद्यार्थ्यांनी करावा आणि त्या विद्यार्थ्यांनी कागदपत्र सादर केल्यानंतर या उपक्रमासाठी ते पात्र ठरणार आहे फक्त 14,900 रूपये सुरुवातीला भरल्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये 14000 पुन्हा वापस मिळणार आहे. त्यामुळे या शैक्षणिक टीव्हीचा लाभ विद्यार्थ्यांना फक्त 900 रुपयात मिळणार आहे.
पुढे बोलताना विजयराज शिंदे म्हणाले की, नरेंद्र मोदींचे हे पाऊल विद्यार्थ्यांच्या यशस्वी भवितव्यकरिता नवी शैक्षणिक क्रांती घडवीनारा ठरणार आहे.
यावेळी योजनेचा लाभ घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी भावनिक होऊन आपले मनोगत व्यक्त करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी आमदार विजयराज शिंदे यांचे आभार व्यक्त केले.