11.6 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img

बुलढाणा ब्रेकिंग  बुलढाण्यात विमानतळ होणार, आ संजय गायकवाड यांची ब्ल्यू प्रिंट तयार..  धार्मिक, ऐतिहासिक व भूगोलिक दृष्ट्या जिल्हा सक्षम..

बुलढाणा ब्रेकिंग 

बुलढाण्यात विमानतळ होणार, आ संजय गायकवाड यांची ब्ल्यू प्रिंट तयार.. 

धार्मिक, ऐतिहासिक व भूगोलिक दृष्ट्या जिल्हा सक्षम..

गेल्या 30 वर्षापसून जिल्ह्यात विमानतळ व्हावे ही जनतेची मागणी आहे.. गेल्या 5 वर्षात कोरोनो काळ असल्याने विकासाच्या कामात वेळ कमी पडल्याने मागे पडलेला विषय मार्गी लागण्याच्या तयारीत दिसून आला आहे.. राज्यात व देशात 2014 पासून सत्ता आहे मात्र आ गायकवाड यांना केवळ 5 वर्ष मिळाले होते आता पुन्हा विजयी झाल्याने आ संजय गायकवाड यांच्या मनातील विकास बुलढाणेकरांनी अनुभवला आहे आता पुन्हा विकासाचा झंझावात सुरु करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे… वास्तविक पाहता शिवसेनेचे खासदार तीन वेळेस निवडून आले होते व विशेष त्यांच्याच मेहेकर विधानसभा मतदार संघात लोणार हे जागतिक दर्जाचे सरोवर आहे त्यासाठी त्यांनी काहीही केले नसल्याने जिल्ह्यातील जनता नाराज होती व त्यांना त्याचा अनुभव चौथ्यांदा लोकसभेत उभे राहिल्यावर आला आहे… मात्र आ संजय गायकवाड यांना केवळ अडीच वर्ष काम करण्यासाठी मिळाले असताना जिल्ह्याचे ठिकाणाचा चेहरा मोहरा बदलून टाकला भरपूर विकास केलाय…

आता केंद्रात व राज्यात सत्ता आलीय त्या अनुष्णगाने जिल्ह्यात प्रथम विमानतळ करण्याचा मानस आ गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.. त्यामुळे शेगाव येथे येणारे देश विदेशातून भाविकांना तसेच राजमाता जिजाऊ जन्मस्थान पाहण्यासाठी येणारे भाविक व लोणार येथे येणारे देश विदेशातील पर्यटक व अभ्यासक यांना मोठा फायदा होणार आहे तसेच विमानतळ झाल्याने जिल्ह्यात मोठ मोठे उद्योग येतील त्यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळेल या उद्देशाने आ संजय गायकवाड हे बुलढण्यात विमानतळ व्हावे यासाठी केंद्राकडे लवकरच पत्र व्यवहार करून या पाच वर्षात विमानतालय्चा कामाला सुरुवात होणार असल्याचे समजते…

Related Articles

ताज्या बातम्या