19.9 C
New York
Thursday, April 23, 2026

Buy now

spot_img

मलकापूर पोलिसांनी एक कोटी 97 लाख 50 हजार रोकड केली जप्त… औरंगाबाद वरून मलकापूर कडे जात होती कार… दोनजन ताब्यात…

बुलढाणा ब्रेकिंग

मलकापूर पोलिसांनी एक कोटी 97 लाख 50 हजार रोकड केली जप्त…

  1. औरंगाबाद वरून मलकापूर कडे जात होती कार… दोनजन ताब्यात…

मलकापुर ते बुलढाणा रोडवरुन सिल्वर रंगाची ईरटीगा कारमध्ये 02 इसम मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेवुन जात आहेत. सदर माहीतीरुन आम्ही पोलीस स्टाफसह तात्काळ बोदवड नाका वानखडे पेट्रोलपंपाजवळ चेकींग करुन मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या वर्णनातील एक सिल्वर रंगाची कार जिचा रजि.क्र. MH20 GV-1781 थांबवुन गाडीतील दोन इसम दोन्ही रा. छत्रपती संभाजीनगर यास आमची पोलीस असल्याची ओळख देवुन गाडी चेक केली असता सदर गाडी मध्ये सिटाचे खाली कप्यात मोठ्या प्रमणात रोख रक्कम असल्याचे दिसुन आली म्हणुन सदर दोन्ही इसमास रक्कम बाबत विचारपुस केली असता त्यांनी रोख रक्कम बाबत समर्पक उत्तर न दिल्याने आणी सदरचे ठिकाण हे वर्दळीचे व रहदारीचे असल्याने त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी होवुन कायदा व सुव्यवस्था बिघडु नये म्हणुन तात्काळ सदरची गाडी पोलीस स्टेशन मलकापुर शहरला आणुन त्याबाबतची माहीती वरीष्ठ अधिका-यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनात तहसिलदार व नायब तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मलकापुर तसेच महसुल विभाग मलकापुरचे 02 शासकीय पंच आणी भारतीय स्टेट बँकचे कॅश मोजण्याचे मशिनसह 02 अधिकारी यांचे समक्ष गाडीतील कॅश मोजणी केली.

सदर गाडीत मिळालेली एकुण रक्कम 1 कोटी 97 लाख 50 हजार रुपये मिळुन आले त्याबाबत उपरोक्त नमुद अधिका-यांच्या समक्ष पंचनामा कार्यवाही करुन आयकर विभाग नागपुर यांना माहीती देवुन जप्त रक्कम आर्म गार्डसह जिल्हा कोषागार कार्यालय बुलढाणा येथे जमा करण्यासाठी रवाना केली आहे. मा. श्री. निलेश तांबे पोलीस अधिक्षक बुलढाणा, मा. श्री. श्रेणीक लोढा अपर पोलीस अधिक्षक खामगाव, मा. श्री सुधिर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा चार्ज मलकापुर यांचे मार्गदर्शनात पुढील चौकशी सुरु आहे. सदर कार्यवाहीमध्ये पो.नि.गणेश गिरी, सपोनि ईश्वर वर्गे, पोहेकॉ श्याम सिरसाठ, पोहेकॉ श्याम कपले, पोकॉ शेख आसिफ, पोकों चरखे, पोकों मनोजकुमार उमाळे, पोकॉ योगेश तायडे, पोकॉ कैलास सोनोने, पोकॉ प्रविण गवई, पोकॉ सुरज चौधरी यांनी सहभाग घेतला होता.

Related Articles

ताज्या बातम्या