मागेल त्याला कर्जमाफी द्या आणि मागेल त्याला पिक विमा द्या किसान ब्रिगेड,आणि शेतकरी योद्धा कृती समितीचा भव्य मोर्चा…. मोर्चा निघाला लोणार तहसील कार्यालयावर.
2 जुन पर्यंत मागण्या मंजूर करा अन्यथा समृद्धी महामार्गावर राष्टरोको आंदोलन करण्याचा दिला इशारा ..
लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळण्याकरिता व ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पिक विमा मिळाला नसल्यामुळे आक्रोश मोर्चाचे आयोजन केले असून पंचायत समिती लोणार येथून दुपारी १२.०० वा. या संदर्भात मा. तहसील कार्यालय लोणार यांना निवेदन देण्या करीता मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सामील झाले होते… राज्य सरकारकडे प्रत्येक शेतकरी कर्जमाफीचे निवेदन देण्यात आले असून ग्रामीण भागामध्ये कर्जमाफीचे फॉर्म भरण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली असून स्वतः शेतकरी फॉर्म भरून घेत आहे, तसेच किसान ब्रिगेडचे सर्वेसर्वा प्रकाश पोहरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मागील त्याला पिक विमा द्या शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा दोन्ही संघटनेच्या नेतृत्वाखाली वरील दोन्ही मागण्या संदर्भात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते…2 जुन पर्यंत मागण्या मंजूर करा अन्यथा समृद्धी महामार्गांवर रास्तारोको करण्याचा इशारा शेतकरी नेते बालाजी सोसे यांनी दिला आहे…



