13.1 C
New York
Thursday, April 23, 2026

Buy now

spot_img

दरोड्याचा प्रयत्न, पत्रकाराच्या कुटुंबाला जिवे मारण्याचा कट?*

*दरोड्याचा प्रयत्न, पत्रकाराच्या कुटुंबाला जिवे मारण्याचा कट?*

बुलढाणा शहरातील प्रसारमाध्यमातील खंबीर आवाज आणि भ्रष्टाचाराविरोधात सतत आवाज उठवणारे ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र देवचंद कायस्थ यांच्या घराजवळ काल (26 मे) दुपारी घडलेली घटना समस्त शहरवासीयांना हादरवणारी ठरली आहे. चार अज्ञात इसमांनी त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी घुसखोरी करत घरफोडीचा प्रयत्न केला. या प्रयत्नात एका कुटुंबातील मुलावर हल्ल्याचाही प्रयत्न करण्यात आला.

घटना शिव शॉपिंग कॉम्प्लेक्स, कारंजा चौक येथे घडली. पत्रकार कायस्थ यांच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर त्यांचे वास्तव्य असून, पहिल्या मजल्यावर व्यापारी मीटिंग हॉल आहे. चार जणांनी परिसरात सर्वेक्षण केल्यावर हॉलचे कुलूप तोडून प्रवेश केला. कुलकर्णी यांच्या आजारी पालकांनी आरडाओरड करत बचाव मागितला. त्यांचा नातू धावून गेला असता, अज्ञात इसमाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

याचवेळी दुसरा इसम कायस्थ यांच्या राहत्या फ्लॅटकडेही पोहोचला होता. कायस्थ यांचा नातू त्याला समोर दिसताच तो तात्काळ पळून गेला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, फुटेज पोलिसांकडे जमा करण्यात आले आहे. हे आरोपी नेमकं कुठल्या उद्देशाने आले होते त्यांच्या हातात असलेल्या पिशवीमध्ये नेमकं काय होते असे विविध प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.

 

याआधीही पत्रकार कायस्थ यांना जीवे मारण्याच्या धमक्या, गाडीला आग लावण्याचा प्रयत्न अशा घटना घडल्या आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या नावाची सुपारी सुद्धा देण्यात आली होती. ज्याने ही सुपारी घेतली होती त्याने ऑन द कॅमेरे समोर आपला गुन्हा कबूल केला होता. पत्रकार जितेंद्र कायस्थ व त्यांच्या परिवाराच्या जीवाला धोका आहे. पोलिसांनी या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित आरोपींना अटक करावी व पत्रकार कुटुंबाच्या सुरक्षेची खात्री द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या