बुलढाणा-
सावकारावर संजय गायकवाड यांचा गंभीर आरोप.. कर्जवसुलीसाठी कर्जदार महिलेला मुलीला राजस्थानमध्ये विकायला लावल्याचा आमदार गायकवाड यांचा आरोप
सावकर सुनील बुरडवर पॉस्को आणि मुलीचा विनयभंग गुन्हा, सावकार सध्या फरार

पिडीत महिलेनी घेतली संजय गायकवाड यांची भेट.. पिडीतांना न्याय देण्याची संजय गायकवाड यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती
राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून पैसे मिळाले नसल्याने बायका गहाण ठेवायला लावल्याचाही गायकवाड यांचा आरोप
बुलढाणा जिल्ह्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावामध्ये सुनील बुरड या अवैध सावकाराने कर्ज फेडता आले नाही म्हणून अवैध सावकारांने कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये विकायला लावली…… काल परवा सावकाराने एका बारा वर्षाचे मुलीवर अतिप्रसंग केला.. असा गंभीर आरोप बुलढाण्याचे आ. संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे..

महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळाले नाहीत म्हणून सावकाराने गहाण ठेवल्या आहेत….. अनेक ठिकाणी सावकाराने व्याजाचे पैसे मिळाले नाही म्हणून शेतकऱ्यांच्या बायकावर त्यांच्या मुलीवर अतिप्रसंग केल्याचा अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोपही संजय गायकवाड यांनी केला आहे.
सावकार कडक कायद्याचा गैरवापर करून हौदोस घालत आहेत….. आम्ही या प्रकरणात उच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ. या आदिवासी गावात सावकार शेतकऱ्यांच्या शेती हडप करत आहे . जो सावकार पैश्यासाठी मुलीला विकायला लावतो अश्या सावकाराची मस्ती सरकारने उतरवावी या बाबत मी विधासभेत आवाज उठवणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ह उप मुख्यमंत्री याना विनंती आहे की या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय द्यावा…. असे संजय गायकवाड म्हणालेत…



