*बुलढाणा ब्रेकिंग*
*बुलढाण्याचा बनत चाललाय बीड…!*
*खामगाव तालुक्यात पून्हा दलित तरुणाला बेदम मारहाण.*
*जिल्ह्यात गेल्या 3 महिन्यात दलित अत्याचाराचा आकडा वाढताच.*

बुलढाणा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस उग्ररूप घेताना दिसत आहे. त्यामुळे बुलढाण्याचा बीड जिल्हा बनत चाललाय की काय..? असा सवाल सामान्यांच्या मनात उभा राहत आहे. मात्र पोलीस प्रशासन अद्यापही कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यास प्रयत्न करताना दिसत नाही.
गेल्याच आठवड्यात खामगाव येथील एका दलित तरुणाला गाय चोरीच्या संशयावरून धर्म विचारत नग्न करून मारहाण केली होती. अजूनही जिल्ह्यात हा मुद्दा तापतच आहे. त्यातच काल पुन्हा एकदा खामगाव तालुक्यात दलित तरुणाला चार ते पाच जणांनी बेदम मारहाण केली आहे. जखमी तरुणावर खामगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याचे प्रकृती गंभीर आहे. अजय सोनटक्के असं दलित तरुणाचं नाव असून तो ट्रॅक्टरने इतरांच्या शेतात मशागतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो . यातूनच वाद होऊन खामगाव तालुक्यातील गणेशपुर येथे तीन ते चार जणांनी या तरुणाला बेदम मारहाण केली. “तू दलित आहेस… तू आम्हाला मानत नाही का..?” अशी शिवीगाळ करत या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यातीलही आरोपी अद्याप फरार आहेत
गेल्या तीन महिन्यात बुलढाणा जिल्ह्यात दलित अत्याचाराच्या 22 ते 23 घटना घडल्यात त्यामुळे बुलढाण्यात पोलीस दलितांना संरक्षण देण्यास कुठेतरी कमी पडत असल्याची भावना दलितांमध्ये निर्माण झाली आहे.



