*यशवंत सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेकडून पर्यावरण मित्र प्रदिप डांगे सन्मानित*...
बुलडाणा शहरातील यशवंत सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा.विनोद फकीरा इंगळे यांच्या सकल्पनेतून बुलडाणा शहरातील विविध क्षेत्रात उल्हेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तिचा सन्मान संस्था दर वर्षी करते,यावर्षी पर्यावरण क्षेत्रात उल्हेखनिय कार्य करणाऱ्या पर्यावरण मित्र प्रदिप डांगे यांचा सत्कार मा. अनिल शेळके,सामाजिक कार्यकर्ते,सुभाष पाटिल,डॉ अतुल वानेरे, यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन करण्यात आला..
प्रदिप डांगे गेल्या 7 ते 8 वर्षा पासुन पर्यावरण क्षेत्रात उल्हेखनिय कार्य करत आहे,यामधे प्रामुख्याने पर्यावरण संरक्षण,पर्यावरण संगोपन, पर्यावरण विषई जनजागृतिपर सायकल रैली,जन्मदिनी वृक्ष लाऊ अंगणी, असे अनेक उपक्रम पर्यावरण मित्र मंडळ यांच्या माध्यमातून करत असतात, याचीच दखल घेऊन *यशवंत सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेकडून पर्यावरण मित्र प्रदिप डांगे यांचा सत्कार सन्मानपत्र देऊन करण्यात आला…
यावेळी प्रमुख उपस्तित प्रा.प्रदिप जाधव,संजय मोरे,गौतम सरकटे, प्रकाश गवई ,सागर जाधव,राज सरकटे, जगताप,प्रशिक झीने सह विशेष उपस्तिति मधे,पर्यावरण मित्र,निलेश शिंदे,अनु माकोने,प्रा.जिवन जाधव ,दिपक पाटिल,सार्थक डांगे सह परिसरातील नागरिक उपस्तित होते…



