13 C
New York
Monday, April 27, 2026

Buy now

spot_img

जिल्हाधिकारी किरण पाटील यांची शेतशिवारात पाहणी; मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही… दिले  आश्वासन”

  1. जिल्हाधिकारी किरण पाटील यांची शेतशिवारात पाहणी; मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही… दिले  आश्वासन”

 

सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी व ढगफुटी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी . किरण पाटील  यांनी किनगाव राजा महसूल मंडळातील सावखेड तेजन, पळसखेड चक्का परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली.

या वेळी उपविभागीय अधिकारी श्री. खडसे , तहसीलदार श्री. दिवटे , कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय सावखेड तेजन परिसरातील सरपंच व गावकरी तसेच पळसखेड चक्का येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पाटील साहेबांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत सांगितले की, “कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याला भरीव मदत मिळेल. मात्र शेतकऱ्यांनी ईपीक पेराची नोंद करून फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे.” असे मार्गदर्शन त्यांनी केले.

शेतकऱ्यांनी मात्र त्यांच्या व्यथा मांडताना गंभीर प्रश्न उपस्थित केले.

शेतकरी बंडू मानटे यांनी सांगितले की, “माल पूर्णपणे सडून दुर्गंधी येण्याची वेळ आली आहे. शेतकरी आता हतबल झाला आहे.”

अनेक शेतकऱ्यांनी मदत अत्यल्प असून खर्च भागत नसल्याची व्यथा मांडली.

पळसखेड चक्का येथील शेतकऱ्यांनी विशेषत: लक्ष वेधले की, मागील वर्षी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या अतिवृष्टीची मदत अद्याप मिळालेली नाही. त्या मदतीपासून शेतकरी वंचित असून यावर्षी पुन्हा मोठे नुकसान झाल्याने बीज उत्पादक शेतकरीही गंभीर संकटात आहे.

याशिवाय बस की चक्क्यातील शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “तीन महिन्यांचे पीक असतानाही तीन बोंड सुद्धा नाहीत, मग शेतकरी जगायचं कसं?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.

त्याचबरोबर त्यांनी मागणी केली की, राज्य सरकारने नुकसानीचा सर्वेक्षण करताना जर पळसखेड चक्का येथे 90% नुकसान दाखवले असेल, तर शेतकऱ्यांना तितक्याच प्रमाणात पिक विमा मिळायला हवा. पिक विमा कंपनीला वेगळे निकष लावण्याचा अधिकार नसावा.

या संदर्भात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी तहसीलदारांना स्पष्ट निर्देश दिले की, “जर कोणी शेतकरी मागील मदतीपासून वंचित असेल तर त्यांना ती मदत तातडीने मिळायला पाहिजे.”

यामुळे शेतकऱ्यांच्या मनात आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे की –
मागील वर्षाची थकलेली मदत खरंच मिळणार आहे का? की पुन्हा शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागणार आहे?

Related Articles

ताज्या बातम्या