बुलढाणा ..
शासकीय खरेदी केंद्रात सोयाबीन विक्रीसाठी ‘अंगठा’, द्यावा लागणार ..
मात्र ज्यांचा बायोमेट्रिक वर ठसे येत नाही त्यांना चकरा माराव्या लागतात ..
नाफेड ची नोंदणी प्रक्रिया मुळे शेतकऱ्यांना अडचणी ..
नाफेडच्या खरेदी केंद्रांमध्ये नोंदणीला प्रारंभ झाल असून आता शासकीय सोयाबीन खरेदीच्या नोंदणी आणि विक्री प्रक्रियेत बायोमेट्रिक पडताळणी बंधनकारक केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.. विशेषतः वयोवृद्ध शेतकऱ्यांचे बोटांचे ठसे न लागणे, सर्व्हर डाउन होणे आणि तासन्तास रांगेत थांबूनही नोंदणी न होणे, या कारणांमुळे शेतकऱ्यांचा त्रास वाढला आहे.. यापूर्वी नोंदणी प्रक्रियेला फक्त आधार, सातबारा, बँक पासबुक झेरॉक्स ही कागदपत्र लागत होती मात्र आता पारदर्शकता आणण्यासाठी बायोमेट्रिक थंब आवश्यक केला असून त्याचीच अडचण शेतकऱ्यांना होत आहे ..



