मलकापूर पांग्रा येथे ‘शराब नही, दूध पियेंगे’ उपक्रमाला २५ वर्षांची गौरवशाली परंपरा……
पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तरुणांनी दूध पिऊन व्यसनमुक्तीच्या संकल्पाने केले नवीन वर्षात स्वागत
नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात न करता सामाजिक भान जपत, व्यसनमुक्त व सशक्त समाजाच्या उभारणीचा संकल्प घेऊन मलकापूर पांग्रा येथे गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने ‘शराब नही, दूध पियेंगे’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. याच परंपरेनुसार ३१ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस मदत केंद्र समोर सायंकाळी ७ वाजता शेकडो तरुणांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी अजित बांगर ठाणेदार गजानन करेवाड, नायब तहसीलदार डॉ. प्रवीण कुमार वराडे गटशिक्षणाधिकारी निकम यांच्या सह विविध मान्यवरांच्या हस्ते दूध प्राशन करून नवीन वर्षाचा जल्लोष साजरा केला
यावेळी सामाजिक कार्यकर्ते गुलशेर खासाब शेख अकील ठेकेदार सरपंचपती यादव टाले संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष मोहम्मद यारखा डॉ दिनकर सोनुने प्रवीण देशमुख सत्तार बाबा लोकजागर चे प्रवीण गीते वसंतराव उदावंत डॉ सुरेश डोडिया तंटामुक्ती अध्यक्ष आरिफ मलिक शंकर उगलमुगले अविनाश नागरे बीट जमादार निवृत्ती पोफळे उपस्थित होते
नवीन वर्ष साजरे करताना दारू, व्यसन, अपघात व आरोग्याच्या समस्या वाढू नयेत, यासाठी तब्बल २५ वर्षांपूर्वी ‘शराब ने दूध पे’ या उपक्रमाची सुरुवात केली. त्या काळात नवीन वर्षाचे स्वागत दारू पिऊन करण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात होती. त्याला छेद देत, “मरीज नहीं, सशक्त बनेंगे” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी तरुणांनी दुधाचे वाटप करून नवे वर्ष साजरे करण्याचा आदर्श पायंडा पाडला.
कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार भगवान साळवे माजी तंटामुक्ती अध्यक्ष हानिप बागवान पत्रकार वसीम शेख ग्राप सदस्य राजू साळवे अमोल साळवे माजी ग्राप सदस्य अर्जुन मगर ज्ञानेश्वर कळकुंबे यांनी केले
व्यसनमुक्तीसाठी एक लाख रुपयाचा पुरस्कार देणार
सत्तार बाबा व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी येणाऱ्या काळात एक लाख रुपयाचे पुरस्कार देणार असल्याचे नुकतेच उमराहून पवित्र यात्रा करून आलेले आलेले सत्तार बाबा यांनी जाहीर केले गाव व्यसनमुक्त करा ग्रामपंचायत मध्ये वाचनालय सुरू करणार गटविकास अधिकारी अजित बांगर
यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना महापुरुषांचे विचार संतांचे विचार आपण अंगीकारण करून विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्या व्यसनमुक्त रहा असा मोलाचा सल्ला देत ग्रामपंचायत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय सुरू करणार असल्याचे गट विकास अधिकारी अजित बांगर यांनी सांगितले
यावेळी नायब तहसीलदार डॉ प्रवीण कुमार वराडे यांनी शराब नही दूध पियेंगे या उपक्रमाची तारीफ करीत करत प्रत्येक गावागावात असे एक नाही अनेक कार्यक्रम व्हायला पाहिजेत त्यामुळे व्यसनमुक्त समाज निर्माण होईल असे सांगितले ठाणेदार गजानन करेवाड यांनी युवकांनी थर्टी फर्स्टला दारू पिऊन भरधाव वाहने चालतात त्यामुळे अपघात होतात हिट अँड रन अनेकांचे जीव गेले आहेत त्यासाठी युवकांनी दारूला पिता दूध प्या आणि सशक्त बना असे आव्हान केले गटशिक्षणाधिकारी निकम यांनी देखील युवकांनी वाचनाची नशा करा महापुरुषांचा वारसा चालवा व्यसनापासून मुक्त व्हा असे आवाहन केले लोकजागाचे प्रवीण गीते यांनी या उपक्रमाचे कौतुक केले प्रास्ताविक गजानन आटोळे सूत्रसंचालन पत्रकार भगवान साळवे आभार प्रदर्शन तंटामुक्ती अध्यक्ष आरीफ मलिक यांनी केले
पोलिस प्रशासन व महसूल शिक्षण आणि सामान्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे या उपक्रमाला युवकांनी मोठा प्रतिसाद दिला



