सैलानी यात्रा महोत्सवाचे नियोजन बैठक संपन्न….
पिंपळगाव सराई येथे सैलानी बाबा यात्रा महोत्सव दि. २ ते ८ मार्च या कालावधीत साजरा

यात्रा महोत्सवात आवश्यक सोयीसुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश उपविभाग अधिकारी शरद पाटील यांनी अधिकार्यांना सुचना दिले आहे. या बैठकीत यांच्यासह विविध गटविकास अधिकारी डॉ.अमित पवार,तहसीलदार कुंबरे, बांधकाम विभागाचे एम आर झिने, आरोग्य विभागाचे डाँ.सरपाते, आर.टी.औ.राधिका चव्हाण, रायपूर पोस्टचे ठाणेदार निलेश सोळंके, विस्तार अधिकारी आरविंद टेकाळे, आरोग्य डाँ. प्रशांत बुधवत सरपंच पती केशव तरमळे, उपसरपंच संजय खंडारे, वनविभाग व्ही. एस. वाकोडे, संतोष वानखेडे सैलानी ट्रस्ट सचिव, पोलीस पाटील रामेश्वर गवते,घाटनांद्रा सरपंच सौ.आनुराधा भुसारी,ग्रामसेवक धंदर, ग्रामविकास अधिकारी अविनाश मानकर,शेख शफिक मुजावर, रशिद मुजावर,कदीर मुजावर विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य नागरिक उपस्थित होते.
यांनी सैलानी यात्रा महोत्सवात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालय, परिसर स्वच्छता, पोलिस बंदोबस्त आदी सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. त्या पार्श्वभूमीवर उपविभाग अधिकारी शरद पाटील यांनी आढावा घेत म्हणाले की, या यात्रेत देशभरातून चार ते पाच लाख भाविक सहभागी होण्याची शकता असते. त्यानुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसवणे, महिला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे, विद्युत सुविधा पुरविणे, स्वच्छता गृह तयार करणे, पार्किंग व्यवस्था निर्माण करणे, सार्वजनिक शौचालय उभारणे, अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, पोलीस बंदोबस्त, बॅरिकेट्स, आरोग्य कक्ष व औषधींचा साठा उपलब्ध करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या.



