31.9 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

बुलढाणा : स्वामी विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त महाप्रसादाचे भव्य आयोजन — २ लाख भाविकांनी घेतला लाभ

बुलढाणा : स्वामी विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त महाप्रसादाचे भव्य आयोजन — २ लाख भाविकांनी घेतला लाभ

बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भव्य धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने तब्बल दोन लाख भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या महाप्रसादाचा लाभ घेतला. या महाप्रसादासाठी सुमारे ३५० क्विंटल गव्हापासून पुरी आणि वांग्याची भाजी असा सात्त्विक व पारंपरिक महाप्रसाद तयार करण्यात आला होता. सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लावून सर्व भाविकांना महाप्रसाद मिळेल याची दक्षता आयोजकांनी घेतली. महाप्रसादाचे वितरण सुरळीत व्हावे यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने महाप्रसाद विविध ठिकाणी पोहोचवण्यात आला, त्यामुळे वेळेवर व नियोजनबद्ध वितरण शक्य झाले. हजारो स्वयंसेवकांनी या उपक्रमात सहभाग घेत स्वच्छता, पंक्ती व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थापन यामध्ये मोलाची भूमिका बजावली.
या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. “स्वामी विवेकानंदांचे विचार समाजाला दिशा देणारे असून अशा उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा वाढतो,” अशी प्रतिक्रिया अनेक भाविकांनी व्यक्त केली.
या भव्य महाप्रसाद वितरणामुळे हिवरा आश्रम व संपूर्ण परिसरात श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचे दर्शन घडले असून आयोजकांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या