15.2 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

पोलीस–पत्रकार समन्वयातून जिल्हा “सुजलाम सुफलाम” करण्याचा संकल्प — एसपी निलेश तांबे…*

बुलढाणा

*पोलीस–पत्रकार समन्वयातून जिल्हा “सुजलाम सुफलाम” करण्याचा संकल्प — एसपी निलेश तांबे…*

“पोलीस आणि पत्रकार यांनी परस्पर समन्वयाने जिल्ह्यात जनजागृतीचे कार्य केल्यास समाज अधिक सुरक्षित, सजग आणि सुसंस्कृत होऊ शकतो. चला, आपण सर्व मिळून जिल्हा सुजलाम–सुफलाम करूया,” असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले.
ते पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित सन्मान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात विविध माध्यमांतील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना श्री. तांबे यांनी पोलीस–पत्रकार संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले.
श्री. तांबे म्हणाले की, पत्रकार हे समाजाचे डोळे आणि कान असून समाजातील चांगल्या–वाईट प्रवृत्ती समोर आणण्याचे महत्त्वाचे कार्य माध्यमांकडून घडते. पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांचा समन्वय मजबूत राहिल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, नागरिकांमध्ये कायद्याबद्दल विश्वास निर्माण करणे आणि जनजागृती घडवणे अधिक प्रभावीपणे शक्य होते.
यावेळी त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कामगिरीचे विशेष कौतुक केले. “जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांचा तपास, अवैध व्यवसायांवर कारवाई, तसेच गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे,” असे सांगत त्यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.
कार्यक्रमात पत्रकारांनीही आपली मते मांडली. पोलीस प्रशासनाकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करत, समाजहितासाठी सकारात्मक पत्रकारिता करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला….या प्रसंगी विविध वरिष्ठ पोलीस अधिकारी, पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, तसेच मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप पोलीस–पत्रकार परस्पर सहकार्य आणि समाजजागृतीचा संकल्प घेऊन करण्यात आला….

Related Articles

ताज्या बातम्या