28.3 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

राजमाता माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी पालकमंत्री, सहपालकमंत्री नतमस्तक*… > बालशिवबासह जिजाऊ पुतळ्याच्या जागेची केली पाहणी

*राजमाता माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी पालकमंत्री, सहपालकमंत्री नतमस्तक*…

  • > बालशिवबासह जिजाऊ पुतळ्याच्या जागेची केली पाहणी

बुलढाणा,

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या ४२८ व्या जयंतीनिमित्त आज पालकमंत्री ना. मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री ना.संजय सावकारे यांनी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थान नतमस्तक होवून अभिवादन केले.

या दौऱ्यात पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गातील सिंदखेडराजा इंटरचेंज फेज क्र ७ येथे उभारण्यात येणाऱ्या बालशिवबासह राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या पुतळ्याच्या जागेची पाहणी केली.

याप्रसंगी आमदार मनोज कायदे, नगराध्यक्ष सौरभ तायडे, जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
००००

Related Articles

ताज्या बातम्या