28.3 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

आज जिल्हा परिषद बुलडाणा येथे माँ जिजाऊ यांची 428 वी तसेच स्वामी विवेकानंद यांची 163 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी….

बुलढाणा

*आज जिल्हा परिषद बुलडाणा येथे माँ जिजाऊ यांची 428 वी तसेच स्वामी विवेकानंद यांची 163 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी….*

 

.या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाब खरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाईक रॅली पासून कार्यक्रमाला सुरुवात झाली माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार त्यांनी बाईक रॅलीला हिरवी झेंडी देऊन बाईक रॅलीला सुरुवात केली.कर्मचाऱ्यांचे अतिशय शिस्तबद्ध नियोजन शहरवासीयांना पहावयास मिळाले व त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळाला.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी येथील चिमुकल्यांनी सांस्कृतिक पेहरावात साकारलेली आई जिजाऊंची वेशभूषा तसेच शिस्तबद्ध व तालबद्ध केलेले लेझीम नृत्य अतिशय प्रशंसा मिळवणारे व कार्यक्रमाची शोभा वाढवणारे ठरले. यानंतर कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊंचे व स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमा पूजन आणि झाली, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाबराव खरात व सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते प्रतिमापूजन व जिजाऊ यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर श्री गजानन कंकाळ सर्व त्यांचा चमूने जिजाऊ मासाहेब यांच्या जीवनावर आधारित स्वरचित गीत सादर केले. त्यानंतर कर्मचारी वर्गातून श्री गजानन गोणेवार व श्रीमती हेमा पासपोळ यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी श्री उमेश जैन यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते श्री. संजय खांडवे यांनी माँ जिजाऊचा जीवन प्रवास व स्वराज्य निमितीसाठी एक पत्नी..एक आई..नि एक आजी मा जिजाऊ ची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर अध्यक्ष भाषणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री गुलाबराव खरात यांनी
शहाजीराजांनी संकल्पिलेले स्वराज्यनिर्मितीचे स्वप्न सत्यात उतरावे यासाठी माँ जिजाऊनी बाल शिवबाला आपले मातृत्व , कर्तृत्व व नेतृत्व या तिन्ही जबाबदाऱ्या निभावत शौर्याचे नि धार्यचे बाळकडू कसे दिले यावरती त्यांनी सखोल प्रकाश टाकला..एकूणच माँ जिजाऊ जयंतीदिनी कार्यक्रम नि वातावरण जिजाऊमय झालेले पाहायल मिळाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा.CEO श्री गुलाब खरात हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. उमेश जैन यांनी केले. श्री विशाल वानखेडे यांनी अतिशय सुंदर व उत्कृष्ट असे सूत्रसंचालनाने कार्यक्रमाच्या यशामध्ये भर घातली.कार्यक्रमाचे समारोपीय मनोगत श्री. शिवशंकर भारसाकळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांनी केले.. दिनेश कोंडेकर यांनी मा जिजाऊ यांच्या प्रतिमेसमोर सुंदर अशी रांगोळी जिजाऊंना मानवंदना दिली.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष पवार तसेच श्री प्रकाश राठोड मुख्य लेखा व वित्त अधिकारी, श्री प्रमोद ऐडोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण, शिवशंकर भारसाकळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत श्री आकाळ शिक्षणाधिकारी माध्यमिक, श्रीमती ठेंग मॅडम शिक्षणाधिकारी योजना… तसेच सर्व खाते प्रमुख व कर्मचारी यांची उपस्थिती होती.. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

ताज्या बातम्या