बुलढाणा
*भाजपाच्या बालेकिल्यात शिवसेनेचा गजर…*
ॲड.अमोल अंधारे यांचा हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश….
*शिंदे गटाला घाटाखाली मिळाले बळ*

नगर परिषेच्या निवडणुकीनंतर बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला असून, भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या खामगावमध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि बजरंग दलाचे माजी जिल्हा संयोजक ॲड.अमोल अंधारे यांनी भाजपातील आपल्या पदाचा राजीनामा देत, शेकडो कार्यकर्त्यांसह शनिवारी शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. ॲड.अमोल अंधारे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाने बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील शिवसेना पाकशाला बळ मिळाले असून भारतीय जनता पार्टीला मोठा झटका मानल्या जात आहे.

ॲड.अमोल अंधारे हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून, गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी संघ परिवारातील विविध संघटनांमध्ये निष्ठेने कार्य केले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल व विश्व हिंदू परिषद या संघटनांमध्ये शाखा संयोजक ते प्रांत सहमंत्री (विदर्भ) अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. तसेच खामगाव नगरीचा ‘गौरव पुरस्कार’ प्राप्त हनुमान व्यायाम मंडळाचे ते सध्या सचिव म्हणून कार्यरत आहेत. हिंदुत्व, राष्ट्रभक्ती आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून त्यांची संपूर्ण विदर्भात ओळख आहे. मागील आठवड्यात अकोला येथील कार्यक्रमात उपमुख्यमनातरी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला होता. या पक्ष प्रवेशावेळी ॲड. अमोल अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खामगाव तालुक्यातील घाटाखालच्या संपूर्ण परिसरातील सुमारे ५१०० हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेश करून घेणार असल्याचे शब्द दिले होते. त्यानुसार काल शनिवारी खामगावातील श्री हरी लॉन येथे भव्य प्रवेश सोहळा पार पडला. भाजपचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या संदर्भात अमोल अंधारे यांना काही शब्द दिले होते. मात्र, तो शब्द पाळला जात नसल्याचे लक्षात येताच अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पक्षाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नाराज होऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दाते शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अंधारे यांचे पक्षात स्वागत करून, त्यांच्या अनुभवाचा शिवसेनेला बुलढाणा जिल्ह्यात नक्कीच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. आगामी जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर अमोल अंधारे यांचा शिवसेना प्रवेश भाजपसाठी मोठी हानी मानली जात आहे. विशेषतः हिंदुत्ववादी मतांवर पकड असलेल्या ॲड.अंधारे यांच्या जाण्याने खामगावच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यावेळी ॲड.अमोल अंधारे म्हणले कि, माजी पक्षावर नाराजी नाही. फक्त दिलेला शब्द पाळल्या गेला नाही आणि त्यासाठी प्रयत्न हि झाले नाही. मि रडनारा कार्यकर्ता नसून, लढनारा आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्ष घाटाखाली मोठा करण्याचे काम हातही घेतले आहे. पक्ष नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढ दिवस निमित्य ना.प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहर व तालुक्यात गांव तिथे शाखा अंतर्गत एकूण 161 शाखा स्थापन करणे आणि 23 जाने ते 9 फेब्रूवारी या काळात शिवसेना संवाद यात्रा काढण्यात येणार असल्याने ॲड.अंधारे माध्यमांशी बोलतांना म्हणाले.



