30.4 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

मेहकर उपतालुका सोशल मिडिया प्रमुखपदी कृष्णा भिमा चव्हाण यांची शिवसेनेत नियुक्ती…*

बुलढाणा

*मेहकर उपतालुका सोशल मिडिया प्रमुखपदी कृष्णा भिमा चव्हाण यांची शिवसेनेत नियुक्ती…*


शिवसेना पक्षाच्या सोशल मिडिया संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देण्यासाठी मेहकर उपतालुक्यात नवी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना सोशल मिडियाच्या मेहकर उपतालुका प्रमुखपदी श्री. कृष्णा भिमा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचे नियुक्तीपत्र आज, २२ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारधारेनुसार तसेच शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना सोशल मिडिया राज्यप्रमुख राहुल एन. कनाल यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
हे नियुक्तीपत्र शिवसेना सोशल मिडिया जिल्हाप्रमुख (बुलढाणा) धनंजय सुभाषचंद्र गायकवाड यांनी प्रदान केले. पक्षाची ध्येयधोरणे, विचारधारा व नेतृत्व जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून सक्रिय प्रचार व प्रसार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कृष्णा चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
पक्ष-संघटनेचे कार्य निष्ठेने, जोमाने व प्रामाणिकपणे पार पाडाल, असा विश्वास व्यक्त करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या नियुक्तीमुळे मेहकर उपतालुक्यात शिवसेना सोशल मिडियाचे कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी मा. आमदार संजय रायमुलकर साहेब, युवासेना सचिव तथा बुलढाणा जिल्हाध्यक्ष ऋषीभाऊ जाधव, युवासेना उपजिल्हाध्यक्ष भूषणभाऊ घोडे, तालुकाप्रमुख संदीप आल्हाट तसेच शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या