23.9 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

रियाधमध्ये भारताचा झेंडा फडकला! एशियन लोक्रॉस स्पर्धेत सुवर्ण कामगिरी…* *बुलढाण्याचा खेळाडू ठरला देशाचा अभिमान…* *भारतीय संघाला गोल्ड मेडल, सागर बोर्डे यांच्या यशाने महाराष्ट्रासह देशभरातून कौतुकाचा वर्षाव..*

*बुलढाणा ब्रेकिंग..*

*रियाधमध्ये भारताचा झेंडा फडकला! एशियन लोक्रॉस स्पर्धेत सुवर्ण कामगिरी…*

*बुलढाण्याचा खेळाडू ठरला देशाचा अभिमान…*

*भारतीय संघाला गोल्ड मेडल, सागर बोर्डे यांच्या यशाने महाराष्ट्रासह देशभरातून कौतुकाचा वर्षाव..*

सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे पार पडलेल्या एशियन आंतरराष्ट्रीय लोक्रॉस खेळ स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताच्या विजयाने देशाचा झेंडा उंचावत क्रीडा क्षेत्रात नवा मान मिळवून दिला आहे.
या विजयी संघात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सागर बोर्डे यांचा समावेश होता. त्यांच्या उत्कृष्ट खेळामुळे त्यांना गोल्ड मेडल मिळाले असून देशपातळीवर त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेत त्यांनी बुलढाणा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे….
भारतीय संघाच्या या ऐतिहासिक यशामुळे देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातही नागरिक, मित्रपरिवार आणि विविध संघटनांकडून सागर बोर्डे यांचा सत्कार करून त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात येत आहे… क्रीडा क्षेत्रात तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या या यशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंची ताकद पुन्हा अधोरेखित झाली आहे…. स्थानिक पातळीवरून जागतिक स्तरापर्यंत पोहोचण्याची क्षमता भारतीय युवकांमध्ये असल्याचा संदेश या विजयातून मिळाला आहे…“जयभीम जयशिवराय” च्या घोषणांसह सागर बोर्डे यांना देशभरातून शुभेच्छा देण्यात येत असून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत…

Related Articles

ताज्या बातम्या