22.9 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

बुलढाण्यात रुग्णवाहिका चालकांचे 21 महिन्यांचे वेतन रखडले; कुटुंबांवर उपासमारीची वेळ — इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी..*

बुलढाणा ब्रेकिंग

*बुलढाण्यात रुग्णवाहिका चालकांचे 21 महिन्यांचे वेतन रखडले; कुटुंबांवर उपासमारीची वेळ — इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी..*

जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले असून तब्बल 21 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. 2024–25 या कालावधीत वेतन थकित राहिल्यामुळे चालकांचे कुटुंब अक्षरशः वाऱ्यावर पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
आरोग्यसेवेतील महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेत सेवा देणारे हे चालक सध्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. नियमित उत्पन्न बंद झाल्याने घरखर्च, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय गरजा आणि कर्जफेड करणे कठीण झाले असल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली आहे…या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी चालकांकडून करण्यात येत आहे. मात्र दीर्घकाळ वेतन न मिळाल्यामुळे नैराश्य वाढल्याचे सांगत काही चालकांनी इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणीही केल्याने या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली आहे. दरम्यान, प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या