चिखला गावात पुन्हा अश्वारूढ शिवरायांचा पुतळा स्थापित — शेकडो शिवभक्तांची उपस्थिती, पोलिस बंदोबस्त कायम…
पुतळा हटवण्याच्या वादानंतर रात्री वाजतगाजत स्थापना; गावात तणावानंतरही शांततेचे आवाहन
बुलढाणा
लोणार तालुक्यातील चिखला गावात सार्वजनिक जागेवर बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन तणावाचे वातावरण तयार झाले होते. पुतळा हटवण्याच्या मुद्द्यावरून गावात मोठ्या प्रमाणात शिवभक्त दाखल झाले होते आणि परिस्थिती लक्षात घेता पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गावाला भेट देऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. मात्र या सर्व घडामोडींनंतरही शनिवारी उशिरा रात्री शिवभक्तांनी पुन्हा एकदा त्याच जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा वाजतगाजत स्थापित केला. या वेळी शेकडो शिवभक्त उपस्थित होते.
सध्या चिखला गावात परिस्थिती नियंत्रणात असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.
लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर पुन्हा एकदा शिवभक्तांनी रात्री अश्वारूढ पुतळ्याची स्थापना केली आहे. या वेळी शेकडो शिवभक्त उपस्थित होते. गावात तणावाची पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिस बंदोबस्त तैनात असून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.



