14.6 C
New York
Sunday, April 19, 2026

Buy now

spot_img

चिखला काकड पुतळा प्रकरण…* *शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्री कायंदे यांचा राजीनामा..*

बुलढाणा ब्रेकिंग

*चिखला काकड पुतळा प्रकरण…*

*शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्री कायंदे यांचा राजीनामा..*

जयश्री दीपक कायंदे यांनी आपल्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी तो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाकडे सादर केला आहे.
माजी आमदार व शिवसेना नेते डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या कथित भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे पत्रात नमूद केले आहे. त्यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात, संबंधित प्रकरणात एकतर्फी भूमिका घेत समाजाबद्दल तिरस्काराची भावना दर्शवली गेल्याचा आरोप केला असून अशा नेतृत्वाखाली काम करणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे….पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करत पक्षाने सर्वसमावेशक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सामाजिक भावनांचा आदर राखण्यासाठी पदत्याग करत असल्याचे सांगितले आहे. तसेच आपला राजीनामा मंजूर करून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
या राजीनाम्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून पुढील राजकीय घडामोडीकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या