19.6 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

चिखला-काकड पुतळा वाद : सत्यता उद्याच्या सभेत मांडणार — वंजारी समाज नेते विनोद वाघ…. ओबीसी समाजाच्या वतीने निषेध मोर्चा व विराट सभेचे आयोजन; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन…

चिखला-काकड पुतळा वाद : सत्यता उद्याच्या सभेत मांडणार — वंजारी समाज नेते विनोद वाघ….

ओबीसी समाजाच्या वतीने निषेध मोर्चा व विराट सभेचे आयोजन; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन…

बुलढाणा
लोणार तालुक्यातील चिखला (काकड) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा वादाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावाबाबत सत्यता मांडण्यासाठी उद्या सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वंजारी समाजाचे नेते विनोद वाघ यांनी दिली आहे.
या प्रकरणात जातीय तेढ निर्माण करून काही समाजातील नागरिक व महिलांना त्रास देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधित घटनेशी संबंध नसतानाही काहींवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येत आहे.
याच्या निषेधार्थ सकल ओबीसी समाज, बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उद्या दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता भव्य निषेध मोर्चा व विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा चिखला काकड  (ता. लोणार, जि. बुलढाणा) येथे होणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या सभेत पुतळा वाद प्रकरणातील घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
लोणार तालुक्यातील चिखला-काकड पुतळा वाद प्रकरणावर उद्या मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. वंजारी समाजाचे नेते विनोद वाघ या सभेत प्रकरणाची सत्यता मांडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सकल ओबीसी समाजाच्या वतीने निषेध मोर्चा व विराट सभेचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या