14.6 C
New York
Sunday, April 19, 2026

Buy now

spot_img

जुना अजिसपूर रोडवर ‘बुलेट’चा कर्कश आवाज;..नागरिक हैराण…* *पोलिसांकडून कडक कारवाईची मागणी…*

बुलढाणा ब्रेकिंग

*जुना अजिसपूर रोडवर ‘बुलेट’चा कर्कश आवाज;..नागरिक हैराण…*

*पोलिसांकडून कडक कारवाईची मागणी…*

बुलढाणा शहरातील जुना अजिसपूर रोड परिसरात कर्कश आवाज करणाऱ्या ‘बुलेट’ दुचाकींचा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत तसेच पहाटेच्या सुमारास सायलेंसरमध्ये फेरफार केलेल्या दुचाकी वेगाने धावत असल्याने परिसरातील शांतता भंग होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही तरुणांकडून दुचाकींच्या सायलेंसरमध्ये बदल करून जाणीवपूर्वक मोठा आवाज निर्माण केला जातो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. शाळा–महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
याशिवाय अतिवेगाने धावणाऱ्या दुचाकींमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचीही माहिती पुढे येत आहे. मागील काही महिन्यांत या मार्गावर अनेक किरकोळ तसेच गंभीर अपघात घडल्याचे नागरिकांनी सांगितले. काही जणांना कायमस्वरूपी दुखापती झाल्याचीही चर्चा आहे.
परिसरातील रहिवाशांनी पोलीस प्रशासनाने विशेष मोहिम राबवून सायलेंसरमध्ये बेकायदेशीर बदल करणाऱ्या व अतिवेगाने वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. नियमित नाकाबंदी, वेगमर्यादा तपासणी आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात दंडात्मक कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने पावले उचलावीत, अन्यथा आंदोलनाचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे. आता पोलीस प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या