18.2 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

मद्यपान करून एसटी बस चालवली? बुलडाणा बसस्थानकावर चालक ताब्यात;*…. *वैद्यकीय अहवालानंतर गुन्हा दाखल होणार…*

बुलढाणा ब्रेक

*मद्यपान करून एसटी बस चालवली? बुलडाणा बसस्थानकावर चालक ताब्यात;*….

*वैद्यकीय अहवालानंतर गुन्हा दाखल होणार…*

खामगाव आगाराची MH 40 N 9585 क्रमांकाची बस खामगाव ते बुलडाणा मार्गावर धावत असताना चालक मद्यपान केलेल्या अवस्थेत वाहन चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ३.१५ वाजता बस बुलडाणाकडे येत असताना बस हेलकावे खात असल्याचे प्रवासी दादाराव बाबुराव शिंदे यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर विभागीय वाहतूक अधिकारी श्री. जाधव व बाहेकर सु.नी. यांनी बुलडाणा बसस्थानक गाठत आगार व्यवस्थापक श्री. गडलिंग यांच्या उपस्थितीत चालक अंकुश नागोराव राउत (चा.क्र. ५३२४०) यांना ताब्यात घेतले.
सदर प्रकरणी चालकास शहर पोलीस स्टेशन, बुलडाणा येथे आणण्यात आले. पोलिसांनी त्यांची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. प्राथमिक तपासणीत चालकाने मद्यार्काचे सेवन केले असल्याचे निष्पन्न झाले, मात्र तो मद्यार्काच्या पूर्ण अमलाखाली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. रक्त तपासणीचा अंतिम वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून परिवहन विभागात खळबळ उडाली आहे….

Related Articles

ताज्या बातम्या