19.6 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

उबाठाला बुलढाण्यात मोठा धक्का! संदीप दादा शेळके यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश..

बुलढाणा ब्रेकिंग

उबाठाला बुलढाण्यात मोठा धक्का! संदीप दादा शेळके यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश..

बुलढाणा जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून उबाठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उबाठाचे नेते तथा बुलढाणा जिल्ह्यातील राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष आणि ‘वन बुलढाणा मिशन’चे संकल्पक संदीप दादा शेळके यांनी आज आपल्या असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते संदीप शेळके यांचा अधिकृतरित्या काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला. या प्रवेशावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संदीप दादा शेळके हे बुलढाणा जिल्ह्यात सामाजिक आणि संघटनात्मक कामासाठी ओळखले जातात. ‘वन बुलढाणा मिशन’च्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले असून जिल्ह्यात त्यांचा मोठा कार्यकर्ता वर्ग आहे. त्यांच्या या निर्णयामुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यावेळी बोलताना शेळके यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला बळ मिळणार असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या