19.3 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

बुलढाणा टीबी हॉस्पिटलमध्ये चोरी….;* *स्वयंपाकघर फोडून भरलेला गॅस सिलेंडर व ऑक्सिजन पाईपलाईन लंपास..*

बुलढाणा ब्रेकिंग..

*बुलढाणा टीबी हॉस्पिटलमध्ये चोरी….;*

*स्वयंपाकघर फोडून भरलेला गॅस सिलेंडर व ऑक्सिजन पाईपलाईन लंपास..*

संपूर्ण देशभरात सध्या गॅस तुटवड्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली असताना बुलढाण्यातील टीबी हॉस्पिटलमध्ये चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉस्पिटलच्या स्वयंपाकघराची खिडकी आणि दरवाज्याची कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी भरलेला गॅस सिलेंडर तसेच इतर साहित्य चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टीबी हॉस्पिटलच्या स्वयंपाकघरात एकूण 17 गॅस सिलेंडर ठेवण्यात आले होते. यापैकी एक भरलेला सिलेंडर चोरट्यांनी लंपास केला. त्याचबरोबर स्वयंपाकघरातील काही इतर साहित्य देखील चोरीला गेले आहे. विशेष म्हणजे हॉस्पिटल परिसरातील तांब्याची ऑक्सिजन पाईपलाईन देखील चोरट्यांनी काढून नेल्याचे उघडकीस आले आहे.
या घटनेत सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हॉस्पिटलसारख्या संवेदनशील ठिकाणी चोरी झाल्याने सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या घटनेमुळे हॉस्पिटल प्रशासनात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या