19.3 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

खामगाव नगरपरिषदेत खोट्या जात प्रमाणपत्राचा आरोप;..* *निवडून आलेल्या नगरसेवकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी..*

बुलढाणा ब्रेकिंग

*खामगाव नगरपरिषदेत खोट्या जात प्रमाणपत्राचा आरोप;..*

*निवडून आलेल्या नगरसेवकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी..*

खामगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवून विजयी झालेल्या उमेदवारावर खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित नगरसेवकाचे पद तत्काळ रद्द करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खामगाव येथील गुलजामा शाह जहीर शाह यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
माहितीनुसार, नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये खामगाव नगर परिषदेत एका उमेदवाराने ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवली आणि तो विजयीही झाला. मात्र निवडणुकीनंतर त्या उमेदवाराच्या कागदपत्रांची कसून तपासणी केल्यानंतर मोहम्मद ईसा मोहम्मद मुसा यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करण्यात आला आहे… गुलजामा शाह जहीर शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित नगरसेवकाचे पद रद्द करावे तसेच त्यांच्यावर देशद्रोहासह कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे…
दरम्यान, या प्रकरणी जात प्रमाणपत्र पडताळणी विभागाकडेही तक्रार करण्यात आली असून येत्या १८ मार्च रोजी या विभागाची भूमिका काय असेल, याकडे खामगावसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे खामगावच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या