बुलढाणा
*बेकायदेशीर LPG गॅस रिफिलिंगवर मोठी कारवाई; खामगाव पोलिसांचा धडक छापा, १.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त …*

जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर LPG गॅस साठवण व रिफिलिंग व्यवसायावर खामगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १,०३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ५ आरोपींवर आवश्यक वस्तू कायद्यानुसार (EC Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत नागरिकांना मिळणाऱ्या LPG गॅसचा काळाबाजार, बेकायदेशीर वाहतूक व रिफिलिंग यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार अपर पोलीस अधीक्षक श्रीपक लोढा (भापोसे) यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने छापेमारी केली.
दि. १७ मार्च २०२६ रोजी, खामगाव शहरातील मुक्ताकळी नगर, पारपेठ, लालपुलाजवळ, भालेगाव रोड, शिवाजीनगर, संत रविदासनगर व काशीरामपुरा या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली.
आरोपींची नावे:
जाकीरखान सिकंदरखान (वय ३७) – मुक्ताकळी नगर, पारपेठ
नितीन गुणाजी परसे (वय ४२) – संत रविदासनगर
लक्ष्मण मोहन हंबर्डे (वय ३२) – शिवाजीनगर
शेरसिंह धनसिंग राजपूत (वय ४०)
शाकीरखान सिकंदरखान (वय ४५) – काशीरामपुरा
जप्त साहित्य:
प्रेशर पंप
विद्युत मोटर
रबरी नळ्या
नोजल
इलेक्ट्रिक बोर्ड
गॅस सिलेंडर
अशा विविध साहित्याचा वापर करून सिलेंडरमधून वाहनांमध्ये गॅस रिफिलिंग केल्याचे उघड झाले आहे.
या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत ₹1,03,000 इतकी असून, सर्व आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. कारवाईतील पथक:
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, खामगाव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
जिल्ह्यातील वाढत्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, अशा बेकायदेशीर प्रकारांवर प्रशासनाचा कठोर नजर असल्याचा संदेश देण्यात आला आहे.



