*तिरुपती ब्रेकिंग…*
*तिरुपतीतील बुलढाणा अर्बन भक्त निवास भोजनालय पुन्हा सुरू; गॅस तुटवड्यानंतर भाविकांना दिलासा…*
*१७ मार्चपासून बंद असलेले भोजनालय २३ मार्चपासून पूर्ववत; भाविकांनी सेवांचा लाभ घ्यावा…*
तिरुपती येथील बुलढाणा अर्बन भक्त निवासमधील भोजनालय गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे १७ मार्च २०२६ पासून तात्पुरते बंद करण्यात आले होते. मात्र, आवश्यक गॅस पुरवठा सुरळीत झाल्यानंतर आज, २३ मार्च २०२६ पासून हे भोजनालय पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आले आहे…. गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या कमतरतेमुळे भोजन व्यवस्था खंडित झाल्याने तिरुपती येथे दर्शनासाठी येणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील तसेच इतर भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः अल्पदरात उपलब्ध होणाऱ्या या भोजनालयाच्या सेवेमुळे अनेक भाविकांची सोय होत असल्याने त्याच्या बंद अवस्थेमुळे नाराजीही व्यक्त होत होती…..दरम्यान, संबंधित व्यवस्थापनाने तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर परिस्थिती नियंत्रणात आल्याने भोजनालय पुन्हा सुरू करण्यात आले असून, आता भाविकांना पूर्वीप्रमाणे भोजनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. भोजनालय पुन्हा सुरू झाल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.



